मुख्य संपादक प्रशांत शाहा
(क )वर्ग दर्जा पर्यटन स्थळ मुतनूर देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा
डॉ प्रणय भाऊ खुणे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना
दिनांक 1आक्टोबर 2025 चामोर्शी तालुक्यातील निसर्गरम्य क वर्ग दर्जा प्राप्त पर्यटन स्थळ
मुतनूर येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली, खुणे कन्स्ट्रक्शन अँड कंपनी, एल, एल, डोंगरवार कन्स्ट्रक्शन अँड कंपनी, यांचे वतीने नवरात्री उत्सव निमित्ताने रक्तदान व आरोग्य शिबिराने दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला!..

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य महाप्रसाद वितरण कार्यक्रम संपन्न झाला! येथे आदिवासी समाजाचे राजाराणी देवस्थान आहे व या ठिकाणी खालच्या भागात खुणे कंट्रक्शन कंपनी व एल, एल डोंगरवार कन्ट्रक्शन कंपनीचे प्रमुख राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांचे परिवार गुरनोली यांचे आराध्य दैवत “आदिशक्ती दुर्गामाता मंदिर “आहे या मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी नवरात्रीला संपूर्ण मुतणुर व परिसरातील हजारो नागरिकांकरिता भव्य महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम असतो यावर्षी सुद्धा सदर महाप्रसाद वितरण संपन्न झाले.गडचिरोली जिल्ह्यातील भाविक भक्त यांनी महाप्रसाद वितरणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहुन मोठया संख्येने महाप्रसाद ग्रहण केले व स्वइच्छेने येथे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान केले व आरोग्य शिबिराचा सुद्धा लाभ घेतला खुणे कंट्रक्शन कंपनीचे प्रमुख डॉ, प्रणय भाऊ खुणे यांच्यावतीने स्व खर्चाने येथे 50 लाख रुपये खर्च करून जयपुर व राजस्थान येथील कलाकारांच्या हस्ते बांधकाम होत असलेल्या दुर्गा मंदिराचे पाहनी केले यावेळी डॉ, प्रणय खुणे यांनी येथील सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडे आवश्यक निधीची मागणी केली कार्यक्रमात प्रामुख्याने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, सल्लागार देवा भाऊ खुणे, कन्स्ट्रक्शन कंपनी संचालक व लोकेश भाऊ डोंगरवार ,राकेश भाऊ डोंगरवार व राहुल भाऊ झोडे, नितेशभाऊ खुणे व संपूर्ण खुणे परिवार गुरनोली ता, कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथील संपूर्ण खुणे परिवार व या भागातील इलाका प्रमुख, गाव पाटील, भूमीया, ग्रामसभा अध्यक्ष,सरपंच, उपसरपंच पोलीस पाटील ,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषाताई मडावी, सामाजिक कार्यकर्ते जगदीश मडावी, प्रमोद आसुटकर युवा मोर्चा नेते सुमेन विस्वास, सुकंठ रॉय, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







