Homeचंद्रपूरप्रा. रवि कांबळे लिखित “संपूर्ण बौद्ध सण “ या ग्रंथाचे प्रकाशन

प्रा. रवि कांबळे लिखित “संपूर्ण बौद्ध सण “ या ग्रंथाचे प्रकाशन

बुद्ध पोर्णिमेच्या शूभ पर्वावर चंद्रपूर दीक्षभूमी येथे दिनांक ५ मे २०२३ रोजी सकाळी १० – ०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपुरचे अध्यक्ष माननीय अरुण घोटेकर यांचे हस्ते प्रा. रवि कांबळे लिखित “ संपूर्ण बौद्ध सण “ ग्रंथाचे प्रकाशन पार पडले. ग्रंथावर भाष्य करताना ते म्हणाले की, बौद्ध संस्कृतीमध्ये जे सण वर्षभर साजरे केले जातात त्या संपूर्ण बौद्ध सणांची माहिती सदर ग्रंथामध्ये दिलेली आहे. लेखकाने अभ्यासपूर्ण व संशोधकाच्या भूमिकेतून या ग्रंथांची मांडणी केली आहे.

“संपूर्ण बौद्ध सण “( पोर्णिमा- अमावस्या- अष्टमी- इतर सण ) या ग्रंथामध्ये लेखकाने वर्षभर बौद्ध विहारात साजरे होणाऱ्या संपूर्ण सणाची सविस्तर माहिती दिलेली आहे. सोबतच प्रत्येक महिन्यात येणारे चार उपोसथ दिन , अरिय अष्टशील उपोसथ का व कसे साजरे करावे याची माहिती दिलेली आहे. बुद्ध सवंत , बुद्ध कालगणना , देश विदेशातील बौद्ध महिने, त्यांची प्रथा परंपरा , चंद्रमानाप्रमाणे, सूर्यमानाप्रमाणे कालगणना याची सविस्तर माहिती संबधित ग्रंथामध्ये दिलेली आहे. याप्रसंगी आपल्या मनोगतातून प्रा. रवि कांबळे यांनी बौद्ध उपासक व उपसिकाकरिता हा ग्रंथ अतिशय मौल्यवान आणि ऊपयुक्त आहे. प्रत्येक बौद्धांनी हा आवर्जून वाचावा व त्याप्रमाणे आचरण करावे असे मत व्यक्त केले. ग्रंथ प्रकाशन प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अशोक घोटेकर , सचिव माननीय वामनराव मोडक , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर, उपप्राचार्य डॉ. संजय बेले , मान. पल्लवी घोटेकर, डॉ. स्निग्धा सदाफळे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप रामटेके यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विजया गेडाम यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी , चंद्रपूर शहरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!