HomeBreaking Newsजिवती येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती थाटामाटात संपन्न..

जिवती येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती थाटामाटात संपन्न..

दिपक साबने,जिवती
जिवती येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जनसेवा प्रतिष्ठान च्या जागेवर साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०१ वि जयंती मोठ्या थाटामाटात नुकतीच पार पडली.
सर्वात पहिल्यांदा समाजाचे जेस्ट नागरिक भोजुकाका गायकवाड व हरिभाऊ मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिवती येथील बस स्टॉप पासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जनसेवा प्रतिष्ठान पर्यंत भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर भाषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटक नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर शिंदे हे होते तर मार्गदर्शन पर कार्यक्रम दत्ता तोगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
मुख्य मार्गदर्शक युवा व्याख्याते ऍड. सचिन मेकाले व इतर पाहुणे विचार पिठावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ऍड. सचिन मेकाले यांनी जवळ पास दिड तासाच्या आपल्या व्याख्यानात बहुजन समाज, बहुजन महापुरुष, मातंग समाजाची दशा व दिशा या विषयावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी अनिस चे राज्य समन्वयक हरिभाऊ पाथोडे, दहागावकर तसेच प्रभाकर शिंदे सर नागपूर, डॉ.अंकुश गोतावळे,दत्ता तोगरे यांची भाषणे झाली. तसेच बार्टी चे समतादुत बालाजी मोरे यांनी अंधश्रध्दा निर्मूलनावर आधारित अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून काही वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास कांबळे यांनी केले, प्रस्ताविक भानुदास जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन भीमशाहीर संभाजी ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रल्हाद मदने, शाहीर तुकाराम जाधव, डॉ.पांडुरंग भालेराव व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी कार्यक्रमात तालुक्यातील व बाहेरून आलेले जवळ पास चारशे ते पाचशे जण सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!