HomeBreaking Newsराजेश बसवेश्वर हजारे 'उत्कृष्ट विद्यार्थी' पुरस्काराने सन्मानित...

राजेश बसवेश्वर हजारे ‘उत्कृष्ट विद्यार्थी’ पुरस्काराने सन्मानित…

सुरज पि.दहागावकर (उपसंपादक)

सरदार पटेल महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन माजी विद्यार्थी संघ व सरदार पटेल महाविद्यालयांकडून दिनांक 27-02-2021 रोजी शांताराम पोटदुखे सभागृहात घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाताई पोटदुखे तसेच विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी सर, माझी कुलगुरू डॉ.किर्तीवर्धन दीक्षित सर प्राचार्य डॉ. राजेश पी. इंगोले सर तसेच उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माद्द्शेटीवार सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

त्यामध्ये राजेश बसवेश्वर यांना गोंडवाना विद्यापीठाच्या उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झालं म्हणून महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघ तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यांनी या पुरस्काराचा श्रेय त्यांचे वडील बसवेश्वर हजारे तसेच आई सत्यमा हजारे व सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पी. इंगोले सर व उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माध्दमशेटीवार सर, कला विभाग प्रमुख डॉ. प्रकाश शेंडे सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शंभरकर सर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय सोमाकुवर सर, रा.से.यो. प्रमुख प्रा. कुलदीप गोंड सर, तसेच त्यांचे आदर्श प्रा.अशोक तीतरमारे सर, भोयर सर, शेख सर इत्यादी गुरुजनाना दिले. तसेच नेहमी त्यांचा पाठीशी असणारे चेतन इदगुरवार, नितीन घरत, सतीश मेंढे, शुभम लोखंडे,ओमकार मोहूर्ले, मनिकंठ गादेवार, राघव सुलवावार तसेच संपूर्ण मित्रपरिवाराला दिले. त्यांनी केलेल्या कार्याचेसर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!